Wednesday 8 June 2011

CHARITRA

चंद्रशेखरेंद्रसरस्वती 
कांची पीठाचे ६८ वे  जगदगुरू (२० मे १८९४ -८ जानेवारी १९९४)
त्यांना महास्वामी व परमाचार्य म्हणूनच ओळखले जाई. यांचा जन्म कर्नाटक ब्राह्मण कुटुंबात झाला. अतिशय तल्लख बुद्धी असलेला हा 'स्वामिनाथन' पुढे कांची पीठाचे शंकराचार्य झाले. त्यांची मुंज १९०५ मध्ये झाली. लहानपणी एका ज्योतिषाने भविष्य वर्तविले कि सर्व जग याच्या पाया पडेल. ६६ वे शंकराचार्यांनी चातुर्मास केला त्या वेळी स्वमिनाथांच्या उपस्थितीने ते प्रभावित झाले. १९०७ साली स्वमिनाथांच्या मावस भावाला कांची पीठाचे ६७ वे शंकराचार्य म्हणून घोषित केले. पण त्यांच्या अचानक निर्वाणानंतर १३ फेब्रुवारी १९०७ ला  स्वमिनाथाना ६८ वे शंकराचार्य म्हणून घोषित केले गेले. लहान वयात मोठी जबाबदारी पडली तरी त्यांनी ती यशस्वी पणे सांभाळली. वयाचा १३व्या वर्षी सन्यास देऊन दि.९ मे १९०७ रोजी पट्टाभिषेक करण्यात आला. त्यांनी ८७ वर्षे मठाचा कारभार सांभाळला. हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार केला. व कांची पिठाला उच्च दर्जा व प्रतिष्ठा मिळवून देली. ८ जानेवारी १९९४ ला त्यांनी देह ठेवला, व उत्तराधिकारी म्हणून श्री जयेंद्र सरस्वती यांची नेमणूक केली. विख्यात पौल बृन्टन यांना त्यांनी सल्ला दिला होता.त्यांचा भक्तांमध्ये प्रामुख्याने खालील लोकांचा समावेश होता, नेपाळचे राजा व राणी, ग्रीसची महाराणी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, सुब्बुलक्ष्मी इत्यादी. 

No comments:

Post a Comment