धाव धाव रे चंद्रशेखरा,करुणाकरा शिवशंकरा ॥
आदिगुरु तो चंद्रशेखर,मनी मानसी कर्पूरगौर ॥
शिवसोमनाथ प्रभास तीर्थी ,क्षयी चंद्रासी आरोग्यप्राप्ती ॥
श्री पर्वती मल्लिकार्जुन,शिवशक्तीचे स्वयंभू स्थान ॥
महांकालेश्वर दक्षिणामुखी,अवंती नगर क्षिप्रेच्या तीरी ॥
शिवपुरीला ॐरेश्वर ,ब्र्म्हपुरीसी अमलेश्वर ॥
केदारेश्वर ज्योतीरुपात ,नर नारायणे केले स्थापित ॥
सह्यपर्वती भीमेच्याकाठी,त्रिपुरारी तो घेई विश्रांती ॥
विश्वेश्वर तो भूतनायक,काशीपुरी ती मोक्ष दायक ॥
त्रिगुणी अवतार त्र्यंबकेश्वर,ब्रह्मगीरीसी शोभे शंकर ॥
धन्वंतरी हा मेरुपर्वती,वैद्यनाथाची परळी वैजयंती ॥
वालुकामय लिंग श्री नागेश्वर,असुराचा केला संहार ॥
रामेश्वर वसे सेतुबंधासी, रामपुजी शिव शंकरासी ॥
एलगंगेकाठी वसे वेरूळ , घृष्णेश्वर तोची कुंकुमेश्वर ॥
मानस कैलास तो येई भूवरी सिंह नादाने शोभे कुरोली ॥
सागरतीरी गोकर्णेश्वर, सह्यगिरी वरी महाबळेश्वर ॥
शंभू महादेव शिंगणापुरी, पार्वती माय औंध डोंगरी ॥
मरीच क्षेत्री दंडोबा देव, म्हसवडासी नाथ भैरव ॥
सोनारसिद्धाची पहा खरसुंडी, मल्लिकार्जुना पहा गोटखिंडी ॥
सावळेश्वर तो पुसेसावळी, वाकडोबा पिंपळोबा तेथे जावळी ॥
आबापुरीसी काळभैरव, रेणावीला सिद्ध रेवण ॥
करहाटकी प्रितीसंगमी, हाटक लिंग तो मुगुट मणी ॥
देवराष्ट्री तो सागरेश्वर यवतेश्वर सात तारे जिथे ॥
मापगावी कनकेश्वर, बाणकोटी हरिहरेश्वर ॥
घारापुरीसी त्रिमूर्ती ईश्वर, मुम्बा नगरीचा वाळकेश्वर ॥
देवगडासी कुणकेश्वर संगमेश्वरी कर्णेश्वर ॥
बुरम्बाडी आम्नायेश्वर, मुरबाडासी मराळेश्वर ॥
उत्तरेश्वर राहे ढमडेरी, हरिश्चंद्र वसे गडावरी ॥
कपर्दीकेश्वर वसे ओतुरी, काशी लिंगाची ती जेउरी ॥
पंचलिंग ते जुन्नरी, रायरेश्वर तो गडावरी ॥
कोतूळ गावी सिद्धेश्वर, पाचवडासी कज्जलेश्वर ॥
नागनाथ तो राहे ललगुणी, सोमेश्वर तो पुण्य पाषाणी ॥
क्षेत्र नासिक नारोशंकर, वत्सगुल्मी तो करुणेश्वर ॥
कोपेश्वर तो खिद्रापुरी, बाहूक्षेत्री राम मारुती ॥
मुळेकाठी ओमकारेश्वर, पर्वतीवरी देवदेवेश्वर ॥
आंबवड्यासी नागालय, अंबरनाथी जुने शिवालय ॥
मार्लेश्वर वसे मारळगावी, श्री बनेश्वर राजगडासी ॥
शिरी धरियेली श्री शिवलिंगा, भीमा तटी राई पांडुरंगा ॥
नागलिंग योनी मस्तकी धरी, आदिमाया राहे करविरी ॥
मांगरीश गोमान्तकासी, सांख्येश लिंग कर्नाटकी ॥
मार्कंडेय लिंग वरुणासंगमी, चक्रेश्वर तीटवे ग्रामी ॥
सातारा येथे सप्तर्षी लिंगे, मेरुलिंग त्यामाजी शोभे वेगळे ॥
सप्तर्षी मंडले कोटी ईश्वर गोमंतकासी सप्तकोटेश्वर ॥

अष्ट अवतार तुझे देखुनी, नतमस्तक ठेवी चरणी ॥
हृदयी भाव हा शुद्ध ठेविला करी प्रार्थना भोळ्या सांबाला ॥
धाव शब्द हा श्रवणी ऐकुनी, भोळा शंकर येई धाउनी ॥
वरदायी तू शिवशूल पाणी, भवशंकर दयाळू मनी ॥
अष्ट अवतारा तूची घेवूनी उमे सहित येई धावुनी ॥
अष्ट भैरव सवे घेवूनी दुष्ट मर्दुनी रक्षी अवनी ॥
प्रलय तांडवे शिवा दमलासी स्थापितो तुला मनी मानसी ॥
कोटी सूर्याची फाकली प्रभा, मृडानी सहित शिव तो उभा ॥
No comments:
Post a Comment