Sunday, 16 October 2011

shree durgaa stotram

ॐश्री दुर्गा पञ्जर स्तोत्रम् 
 हे देवी ,
तुझी गुण संपदा  अपार आहे .गुणाच्या या कोशात तुझे रूप सामावले आहे .ज्यांनी ध्यान योगाची साधना केली त्याना तू दर्शन दिलेस .ईश्वराच्या अंगी असणारी मूर्तिमंत शक्ती तूच आहेस .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी  माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू देवाचे सामर्थ्य आहे .तू आत्म्याचे बळ आहेस . वेदांनी तुझा असा महिमा गायला आहे .मोठ्या तपस्वी  मुनी जनाच्या  समोर तू अवतीर्ण झालीस . तू परम गूढ  आहेस , तू सर्व व्यापी आहेस  तू संत तत्वाचे  अधि ष्ठान आहेस . हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी  माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू परब्रह्माच्या  विविध शक्तीचा स्त्रोत आहेस . श्वेता श्वेतर  उपनिष दाच्या  शब्दामधून तुझ्या रूपाचे कला कल्मष  झाले आहेस .ज्ञान .बळ आणि क्रिया  तुझ्या स्वरूपातून आपोआप  प्रगट होतात .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी  माझे रक्षण कर 
.हे देवी ,
कूर्म आणि मत्स्य  पुराणात तुला देव आणि आत्मा  असे संबोधिले आहे . तू साक्षात  सदाशिवाचा आत्मा आहेस .भव पाशातून  तू मानवाला  मुक्त करतेस .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी  माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू ब्रह्म  तत्वाचा अंतरात्मा आहेस . तू अनेक रूपे  धारण करतेस .मयुरी या नावाने तू विख्यात  आहेस .तू अर्जुनाला  गीतेचा उपदेश केलास . जगातील सर्व ज्ञानाचा  तू आत्मा आहेस . हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर 
भक्तानो ,
देवी स्तीत्राच्या अर्थाचे मनन करा .देवीची मनोभावे प्रार्थना करा . त्यामुळे तुमचे चित्त शुद्ध होईल . तुमचे जीवन मांगल्य मय होईल .तुमच्या जीवनाचे साफल्य होईल .
श्री दुर्गायै नमः  इति श्री चंद्र शेखरेंद्र स्वामी  रचित  श्री दुर्गा स्तोत्रम संपूर्ण 

Friday, 26 August 2011

shankaraachry and his mathas

श्री  जगद्गुरू शंकराचार्य  मुख्य पीठे व उपपीठे 
१)ज्योतिषपीठ 
२ )गोवर्धनपीठ -पुरी 
३ )शारदापीठ 
४ ) शृंगेरी 
५ ) कामकोटीपीठ 
उपपीठे -
१ ) कुडलीमठ
२ )शिव गंगा मठ 
३ )अवनी मठ 
४ )विरुपाक्ष मठ 
५ )पुष्प गिरी मठ 
६ )संकेश्वर मठ -करवीर मठ 
७ )रामचंद्र पूर मठ 
१ )हरिहर पूर मठ 
२ )भंडीगेडी मठ 
३ )यडनीरु मठ 
४ )कोदन्डाश्रम मठ
५ )स्वर्णवल्ली मठ
६ )नेलमावू मठ
७ ) योग नरसिंह  स्वामी मठ 
८ )बाल कुदुरू मठ    

Wednesday, 8 June 2011

CHARITRA

चंद्रशेखरेंद्रसरस्वती 
कांची पीठाचे ६८ वे  जगदगुरू (२० मे १८९४ -८ जानेवारी १९९४)
त्यांना महास्वामी व परमाचार्य म्हणूनच ओळखले जाई. यांचा जन्म कर्नाटक ब्राह्मण कुटुंबात झाला. अतिशय तल्लख बुद्धी असलेला हा 'स्वामिनाथन' पुढे कांची पीठाचे शंकराचार्य झाले. त्यांची मुंज १९०५ मध्ये झाली. लहानपणी एका ज्योतिषाने भविष्य वर्तविले कि सर्व जग याच्या पाया पडेल. ६६ वे शंकराचार्यांनी चातुर्मास केला त्या वेळी स्वमिनाथांच्या उपस्थितीने ते प्रभावित झाले. १९०७ साली स्वमिनाथांच्या मावस भावाला कांची पीठाचे ६७ वे शंकराचार्य म्हणून घोषित केले. पण त्यांच्या अचानक निर्वाणानंतर १३ फेब्रुवारी १९०७ ला  स्वमिनाथाना ६८ वे शंकराचार्य म्हणून घोषित केले गेले. लहान वयात मोठी जबाबदारी पडली तरी त्यांनी ती यशस्वी पणे सांभाळली. वयाचा १३व्या वर्षी सन्यास देऊन दि.९ मे १९०७ रोजी पट्टाभिषेक करण्यात आला. त्यांनी ८७ वर्षे मठाचा कारभार सांभाळला. हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार केला. व कांची पिठाला उच्च दर्जा व प्रतिष्ठा मिळवून देली. ८ जानेवारी १९९४ ला त्यांनी देह ठेवला, व उत्तराधिकारी म्हणून श्री जयेंद्र सरस्वती यांची नेमणूक केली. विख्यात पौल बृन्टन यांना त्यांनी सल्ला दिला होता.त्यांचा भक्तांमध्ये प्रामुख्याने खालील लोकांचा समावेश होता, नेपाळचे राजा व राणी, ग्रीसची महाराणी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, सुब्बुलक्ष्मी इत्यादी. 

Sunday, 1 May 2011

Adi Guru Stuti.


धाव धाव रे चंद्रशेखरा,करुणाकरा शिवशंकरा 
आदिगुरु तो चंद्रशेखर,मनी मानसी कर्पूरगौर 
शिवसोमनाथ प्रभास तीर्थी ,क्षयी चंद्रासी आरोग्यप्राप्ती 
श्री पर्वती मल्लिकार्जुन,शिवशक्तीचे स्वयंभू स्थान 
महांकालेश्वर दक्षिणामुखी,अवंती नगर क्षिप्रेच्या तीरी 
शिवपुरीला ॐरेश्वर ,ब्र्म्हपुरीसी अमलेश्वर 
केदारेश्वर ज्योतीरुपात ,नर नारायणे केले स्थापित 
सह्यपर्वती भीमेच्याकाठी,त्रिपुरारी तो घेई विश्रांती 
विश्वेश्वर तो भूतनायक,काशीपुरी ती मोक्ष दायक 
त्रिगुणी अवतार त्र्यंबकेश्वर,ब्रह्मगीरीसी शोभे शंकर 
धन्वंतरी हा मेरुपर्वती,वैद्यनाथाची परळी वैजयंती 
वालुकामय लिंग श्री नागेश्वर,असुराचा केला संहार 
रामेश्वर वसे सेतुबंधासी,  रामपुजी शिव शंकरासी ॥ 
एलगंगेकाठी वसे वेरूळ , घृष्णेश्वर तोची कुंकुमेश्वर ॥
मानस कैलास तो येई भूवरी सिंह नादाने शोभे कुरोली ॥
सागरतीरी गोकर्णेश्वर, सह्यगिरी वरी महाबळेश्वर ॥
शंभू महादेव शिंगणापुरी, पार्वती माय औंध डोंगरी ॥
मरीच क्षेत्री दंडोबा देव, म्हसवडासी नाथ भैरव ॥
सोनारसिद्धाची पहा खरसुंडी, मल्लिकार्जुना पहा गोटखिंडी ॥
सावळेश्वर तो पुसेसावळी, वाकडोबा पिंपळोबा तेथे जावळी ॥
आबापुरीसी काळभैरव, रेणावीला सिद्ध रेवण ॥
करहाटकी प्रितीसंगमी, हाटक लिंग तो मुगुट मणी ॥
देवराष्ट्री तो सागरेश्वर यवतेश्वर सात तारे जिथे ॥
मापगावी कनकेश्वर, बाणकोटी हरिहरेश्वर ॥
घारापुरीसी त्रिमूर्ती ईश्वर, मुम्बा नगरीचा वाळकेश्वर ॥
देवगडासी कुणकेश्वर संगमेश्वरी कर्णेश्वर ॥
बुरम्बाडी आम्नायेश्वर, मुरबाडासी मराळेश्वर ॥
उत्तरेश्वर राहे ढमडेरी, हरिश्चंद्र वसे गडावरी ॥
कपर्दीकेश्वर वसे ओतुरी, काशी लिंगाची ती जेउरी ॥
पंचलिंग ते जुन्नरी, रायरेश्वर तो गडावरी ॥
कोतूळ गावी सिद्धेश्वर, पाचवडासी कज्जलेश्वर ॥
नागनाथ तो राहे ललगुणी, सोमेश्वर तो पुण्य पाषाणी ॥
क्षेत्र नासिक नारोशंकर, वत्सगुल्मी तो करुणेश्वर ॥
कोपेश्वर तो खिद्रापुरी, बाहूक्षेत्री राम मारुती ॥
मुळेकाठी ओमकारेश्वर, पर्वतीवरी देवदेवेश्वर ॥
आंबवड्यासी नागालय, अंबरनाथी जुने शिवालय ॥
मार्लेश्वर वसे मारळगावी, श्री बनेश्वर राजगडासी ॥
शिरी धरियेली श्री शिवलिंगा, भीमा तटी राई पांडुरंगा ॥
नागलिंग योनी मस्तकी धरी, आदिमाया राहे करविरी ॥
मांगरीश गोमान्तकासी, सांख्येश लिंग कर्नाटकी ॥
मार्कंडेय लिंग वरुणासंगमी, चक्रेश्वर तीटवे ग्रामी ॥
सातारा येथे सप्तर्षी लिंगे, मेरुलिंग त्यामाजी शोभे वेगळे ॥
सप्तर्षी मंडले कोटी ईश्वर गोमंतकासी सप्तकोटेश्वर ॥
वालुकामय लिंग श्री नागेश्वर,असुराचा केला संहार 
रामेश्वर वसे सेतुबंधासीरामपुजी शिव शंकरासी  
एलगंगेकाठी वसे वेरूळ , घृष्णेश्वर तोची कुंकुमेश्वर 
मानस कैलास तो येई भूवरी सिंह नादाने शोभे कुरोली 
सागरतीरी गोकर्णेश्वरसह्यगिरी वरी महाबळेश्वर 
शंभू महादेव शिंगणापुरीपार्वती माय औंध डोंगरी 
मरीच क्षेत्री दंडोबा देवम्हसवडासी नाथ भैरव 
सोनारसिद्धाची पहा खरसुंडीमल्लिकार्जुना पहा गोटखिंडी 
सावळेश्वर तो पुसेसावळीवाकडोबा पिंपळोबा तेथे जावळी 
आबापुरीसी काळभैरवरेणावीला सिद्ध रेवण 
करहाटकी प्रितीसंगमीहाटक लिंग तो मुगुट मणी 
देवराष्ट्री तो सागरेश्वर यवतेश्वर सात तारे जिथे 
मापगावी कनकेश्वरबाणकोटी हरिहरेश्वर 
घारापुरीसी त्रिमूर्ती ईश्वरमुम्बा नगरीचा वाळकेश्वर 
देवगडासी कुणकेश्वर संगमेश्वरी कर्णेश्वर 
बुरम्बाडी आम्नायेश्वरमुरबाडासी मराळेश्वर 
उत्तरेश्वर राहे ढमडेरीहरिश्चंद्र वसे गडावरी 
कपर्दीकेश्वर वसे ओतुरीकाशी लिंगाची ती जेउरी 
पंचलिंग ते जुन्नरीरायरेश्वर तो गडावरी 
कोतूळ गावी सिद्धेश्वरपाचवडासी कज्जलेश्वर 
नागनाथ तो राहे ललगुणीसोमेश्वर तो पुण्य पाषाणी 
क्षेत्र नासिक नारोशंकरवत्सगुल्मी तो करुणेश्वर 
कोपेश्वर तो खिद्रापुरीबाहूक्षेत्री राम मारुती 
मुळेकाठी ओमकारेश्वरपर्वतीवरी देवदेवेश्वर 
आंबवड्यासी नागालयअंबरनाथी जुने शिवालय 
मार्लेश्वर वसे मारळगावीश्री बनेश्वर राजगडासी 
शिरी धरियेली श्री शिवलिंगाभीमा तटी राई पांडुरंगा 
नागलिंग योनी मस्तकी धरीआदिमाया राहे करविरी 
मांगरीश गोमान्तकासीसांख्येश लिंग कर्नाटकी 
मार्कंडेय लिंग वरुणासंगमीचक्रेश्वर तीटवे ग्रामी 
सातारा येथे सप्तर्षी लिंगेमेरुलिंग त्यामाजी शोभे वेगळे 
सप्तर्षी मंडले कोटी ईश्वर गोमंतकासी सप्तकोटेश्वर 
अष्ट अवतार तुझे देखुनीनतमस्तक ठेवी चरणी 
हृदयी भाव हा शुद्ध ठेविला करी प्रार्थना भोळ्या सांबाला 
धाव शब्द हा श्रवणी ऐकुनीभोळा शंकर येई धाउनी 
वरदायी तू शिवशूल पाणीभवशंकर दयाळू मनी 
अष्ट अवतारा तूची घेवूनी उमे सहित येई धावुनी 
अष्ट भैरव सवे घेवूनी दुष्ट मर्दुनी रक्षी अवनी  
प्रलय तांडवे शिवा दमलासी स्थापितो तुला मनी मानसी 
कोटी सूर्याची फाकली प्रभामृडानी सहित शिव तो उभा